राजूरवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये 2 कोटी 43 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

27
🔹भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल — आमदार देवेंद्र भुयार
🔸सिंभोरा, नसिदपूर, पार्डी, तळणी, पिंपळखुटा मोठा, येवती
येथील नागरिकांनी मानले आ. देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.7जुलै):-विधानसभा मतदार संघामध्ये पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळणार आहे असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज केले.ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक विकास कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शिंभोरा येथील जि.प. शाळा ते हनुमान मंदीरापर्यंत सिमेंट कांक्रीट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रु, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 5.75 लक्ष रु, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे भूमिपूज 7 लक्ष रु.नाशिदपुर येथील स्मशानभुमी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 5.75 लक्ष रु सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे भूमिपूजन 7 लक्ष रु. पार्डी येथील पार्डी ते शिरी पांधनरस्ता खडीकरण करने 27.82 लक्ष रु, MREGS अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रु, मुरलीधर कोहळे ते श्री. नेवारे यांचे शेतापर्यंत पांधन रस्ता खडीकरण करणे 24.96 लक्ष रु, नितीन निर्भरकर ते गोपालराव यांचे शेतापर्यंतपांधन रस्ता खडीकरन करणे 24.96 लक्ष रु, उजवा कालवा ते श्री. गोपाल निभोरकार यांचे शेतापर्यंतपांधन रस्ता खडीकरण करणे 24.96 लक्ष रु, तळणी येथील रामभाऊ भलावी ते प्रभु उईके पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 7.00 लक्ष रु.मौजा हासनपुर वार्ड नं 3 मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रु. पिंपळखुटा मोठा येथील डॉ. धुर्वे ते पाझर तलाव पांधन रस्ता खडीकरण करणे 24.96 लक्ष रु. उजवा मायनर ते अशोक सायवाल, पांधन रस्ता खडीकरण, करणे 24.96 लक्ष रु, मेन रोड ते सुधाकर बोपचे यांचे घरापर्यंत पर्यत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे 5.75 लक्ष रु, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रु.

येवती येथील दादाराव कावल ते त्र्यंबक पांडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 5.75 लक्ष रु. दादाराव कावल ते सुभाशराव वडे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 7.00 लक्ष रु या सर्व विकसकामांकरिता 2 कोटी 43 लक्ष 62 हजार रुपये निधी मंजूर करून आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी भूमिपूजन समारंभाला आमदार देवेंद्र भुयार, शिंभोरा, नसिदपूर, पार्डी, तळणी, पिंपळखुटा मोठा , येवती येथील सरपंच उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती .