पतसंस्थेचे संगणकीकरण करून कारभारात पारदर्शकता आणणार- विजय खरोडे

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.8जुलै):- पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शालेय कर्मचारी पतसंस्थेत 25 वर्षापासून एकहाती सत्ता असल्यामुळे मोठी सभासद संख्या व आर्थिकरित्या सधन असलेल्या या संस्थेची वाटचाल अधोगतीकडे चालल्याने सत्ता परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक विजय खरोडे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे बोलाविलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

व्याजदरात इतर पतसंस्थेच्या तुलनात जमीन आसमानाचा फरक जाणवतो मागील सदस्यांनी जाहीरनामांमध्ये 13 टक्के व्याजदर सांगण्यात आले व पतसंस्थेमध्ये 14.50% टक्के व्याजदर सदस्यांना लावण्यात येतो तसेच व्याजदरामध्ये स्पष्टता नाही कर्जदार अनेक वर्षापासून आर्थिक बोजाखाली होरपळत आहे 50 वर्षांपूर्वीची संस्था पंरतु 25 वर्षापासून कार्यरत ‘ ब ‘ दर्जाचाच परंतु ठेवीचा विनीयोग करून व्याजदर कमी करता येऊ शकतो.

संस्था आजही आर्थिक स्वयंपूर्णता नाही मागील बरेच काळापासून 500 सभासद कमी झालेले पहावयास मिळते संस्थेचे संपूर्ण संगणकीरण झालेले नाही.

पतसंस्थेमध्ये एकूण सभासद 3442 असून अधिकृत सभासद 2684 आहेत दर पाच वर्षांनी पतसंस्थेची निवडणूक होते मागील सभासदांच्या कामांमध्ये अनियमितता दिसूनही वरिष्ठ कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही वारंवार माहितीचा अधिकार मध्ये पत्रव्यवहार केले असता सभासदांना कुठलाही लाभ होत नाही एकंदरीत संस्थेची उलाढाल दीडशे कोटीची असल्याचे सांगण्यात आले तसेच परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी सध्याच्या परिस्थितीत सर्वीकडे शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ शकते..! असेही परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी वरिष्ठांकडे सांगण्यात आले सदर निवडणुकीमध्ये संस्थेचा निवडणुकीमध्ये अवाजवी खर्च होऊ नये म्हणून विरोध सुद्धा करण्यात आला होता.

जर परिवर्तन पॅनल निवडून आला या पतसंस्थेला सर्वप्रथम संगणकीकरण करून व व्याजदर कमी करून सभासदांच्या ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करेल असे विजय खरोडे परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळीअविनाश रोकडे,शालेय पतसंस्था उमेदवार श्याम पंचभाई, चक्रधर देवसरकर ,रमेश चव्हाण, पतसंस्थेचे सदस्य किशोर वनारसे ,सोपान जाधव हे उपस्थित होते.

परिवर्तन पॅनलच्या उमेदवारीसाठी विविध जाती धर्मातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे.तसेच दिनांक 10 जुलै रोजी परिवर्तन पॅनलच्या विरुद्ध सहकार पॅनल जंगी चुस्ती होण्याचे सांगण्यात आले या वीस वर्षाच्या इतिहासात 13 संघटनांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनलच्या वतीने मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्यात आले सय्यद निसार सय्यद मुस्तफा या उमेदवारांना उमेदवारी देऊन परिवर्तन पॅनलने एकीचे चित्र दाखवले.

तसेच परिवर्तन पॅनलला 18 संघटनांचा पाठिंबा आहे.

पतसंस्था 25 वर्षापासून एका गटाच्या हाती आहे आणि लोकशाहीमध्ये जेव्हा एखादी संस्था एकाच गटाच्या हाती असते तेव्हा तेथे हुकूमशाही प्रस्थापित होत असते.

तशाच प्रकारे हुकुमशाही आज आपल्या यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था सुरू झाली असून आज रोजी तेथील अनियमितता भ्रष्टाचाराची सर्वत्र चर्चा पसरलेली आहे.
त्यामुळे शिक्षण क्षेत्र डागावल्या जात आहे शिक्षणाकडे पाहण्याचा सावकारी दृष्टिकोन सुद्धा लोकांमध्ये तयार झाला आहे.

अशावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मालकीची ही पतसंस्था एका विशिष्ट घराण्यासाठी प्रायव्हेट प्रॉपर्टी बनलेली असून तेथे हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू झालेला आहे तेथील प्रस्थापित सत्ताधीश हे इतरांना तिथे घुसून सुद्धा देत नाही.

13 संघटनांना एकत्र करून सर्वांच्या समोर परिवर्तन पॅनल हा पर्याय उभा करून दिलेला आहे.

ही पतसंस्था शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राहावी व ती पतसंस्था कुण्या एका व्यक्तीच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी बनू नये म्हणून परिवर्तनवादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिवर्तनवादी व मानवतावादी कर्मचाऱ्यांनी परिवर्तन पॅनलला विजयी करून दाखवु असे प्रतिपादन करण्यात आले.