निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणुका जाहीर

65

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.8जुलै):- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आला आहे. आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला वेळापत्रक दिनांक 28 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर, 19 ऑगस्टला लगेचच निकाल देखील लागणार आहे आयोगाच्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नाशिक, लातूर, अमरावती ,उस्मानाबाद व बुलढाणा या जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि एकूण 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आला.