मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी-अखिल भारतीय समता परिषदची मागणी

37

✒️अतुल उनवणे ,जालना(जिल्हा प्रतिनिधी)

जालना(2जुलै):-मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणी सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार. उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री नामदार.अनिलजी देशमुख साहेब यांना देण्यात आले.
मंठा येथील वैष्णवी गोरे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मंठा शहरातील बाजारपेठेवत आरोपी शेख अल्ताफ बाबु याने धारदार शस्त्राने गळा कापून खुन केला.
पाच दिवसापुर्वी वैष्णवी गोरे हिचा विवाह झाला होता, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे गोरे कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती.अठराविश्व दारिद्रय तसेच हालाकीच्या परिस्थितीशी दोन हात करत वडिलांनी वैष्णवीचा विवाह केला होता, चार दिवसापुर्वी वैष्णवीचा विवाह झाला असताना, विवाहानंतर मंठा येथे आलेल्या वैष्णवीचा आरोपी शेख अल्ताफ बाबु याने निर्दयीपणे धारदार शस्त्राने खुन केला, आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी व सदरील प्रकरण हे फास्टट्रक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
सदरील निवेदन नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने मा.खासदार समीरभाऊ भुजबळ यांनी स्विकारले.