नहुष नागनाथ गोरगिळे ची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9जुलै):-रत्नाकरराव गुट्टे इंटरनॅशनल स्कूल वडगाव स्टेशन तालुका सोनपेठ येथील नहुष नागनाथ गोरगिळे यांने इयत्ता सहावी प्रवेशासाठी आवश्यक असणारी जवाहर नवोदय विद्यालय मार्फत घेतली जाणारी परीक्षा दिली होती. आज दिनांक 08/07/2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय समितीने निकाल जाहीर केला असून त्यामध्ये नहुष नागनाथ गोरगिळे पात्र झाला आहे.

नहूष च्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तो मनीषा गोरगिळे व नागनाथ गोरगिळे यांचा मुलगा असून हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.नहूषच्या यशाबद्दल विचारले असता त्यांनी नहूषला मार्गदर्शन करणारे जनाई कोचिंग क्लासेस चे संचालक श्रीमान बोबडे एच. आर. यांचे विशेष आभार मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED