वेकोलीच्या तानाशाही धोरणा विरोधात रस्ता रोको आंदोलन

🔹माजी जि.प.विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

वणी(दि.9जुलै):- तालुक्यातील कोलगाव,मुंगोली उपक्षेत्रा अंतर्गत वेकोली कडून निर्माण झालेल्या समस्या बाबत ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोलगाव चेक पोस्ट रस्त्यावर माजी जि.प.विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आ.श्री.संजिवरेड्डीजी बोदकुरवार,शेतीकरी नेते श्री.दिनकर पावडे,माजी उपसभापती विजय गारघाटे, सरपंच ज्योती माथुलकर (माथोली),सरपंच मंगला भटवलकर (चिखली),सरपंच गणेश जेनेकर (कोलगाव),सरपंच निलेश पिंपळकर (साखरा,गणेश रोडे, विश्वास बोरपे, निखिल उपासे,कुणाल डोहे व गावकरी उपस्थित होते.

या रस्ता रोको आंदोलना दरम्यान वेकोली प्रशासनाचे अधिकारी एच.एस.सालुखे, उपक्षेत्रीय प्रबंधक आर.डी.गील,प्रबंधक मुंगोली ओसिएम देवराजन, यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

कोलगाव चेक पोस्ट जवळील रस्ता दोन भागात करणे,साखरा ते मुंगोली पुला पर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे,मुंगोली ते शिवणी रस्ता ७०० मिटर स्टोन डस्ट करण्या बाबत,चिखली टाकळी पर्यंत बारीक चुरी टाकुन रस्ता दुरुस्त करणे,मुंगोली व जूगाद ओ.बि.देण्या बाबत, ईत्यादी मुख्य मागण्या संदर्भात वेकोली प्रशासनाने आंदोलन करत्यांणा जबाबदारी स्वीकारून संपूर्ण समस्यांचे निराकरण करणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्र्वासन दिल्याने २५ जुलै पर्यंत तात्पुरते आंदोलन मागे करण्यात आले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED