प्रेम व पाऊस कवितांची ओलेचिंब बोल्ड काव्यमैफलचे आयोजन

29

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10जुलै):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय,पुणे वतीने दि.१७ एप्रिल २०२२ रविवार रोजी सकाळी ११ वा बोल्ड कवींची, स्मार्ट काव्यमैफलचे आयोजन करण्यात आलेली आहे. जशी लावणी थिएटरला आली आणि तिला प्रतिष्ठा मिळाली. त्याप्रमाणे कविता थिएटरला आणुन तिला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी “काव्यातील नक्षञ..काव्यवाचन आविष्कार” या थिएटर दुस-या प्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सुप्रसिदध कवी कवयिञी यांना या प्रयोगासाठी निमंञण देण्यात आले आहे. प्रत्येक कवी कवयिञी हे प्रेम आणि पाऊस या विषयावरील बहारदार कवितांचे पुणे येथिल एस. एम. जोशी सभागृह, पञकार भवन मागे, गांजवे चौक, पुणे ३० येथे दिमाखात संपन्न होणार आहे. या कवितेच्या अनोखी प्रयोगाची उत्सुकता पुणे रसिकांना लागली आहे.

हा दुसरा थिएटरचा प्रयोग आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक श्री.वसंत टाकळे (प्रभारी उप कार्यकारी अभियंता-राष्टीय महामार्ग विभाग, रत्नागिरी)उपस्थित राहत आहे.

“काव्यातील नक्षञ..काव्यवाचन आविष्कार..”बोल्ड कवींची, स्मार्ट काव्यमैफल मध्ये सहभाग -सौ.वृषाली टाकळे (रत्नागिरी), सौ. डाॅ. माधुरी बागुल (नाशिक), डाॅ.शांताराम कारंडे (मुंबई), श्री यशवंत घोडे (जुन्नर), डाॅ,लक्ष्मण हेंबाडे (डोंगरगाव), प्रा.नरेंद्र पोतदार (गोंदिया), श्री दिनेश चव्हाण (चाळीसगाव), श्री.रामचंद्र पंडित (सातारा), श्री.पियुष काळे (आळे), सौ. डाॅ. अलका नाईक (मुंबई), प्रा. प्रकाश पाटील (जळगाव) ,श्रीमती मंदाताई वाघमारे (यवतमाळ), सौ. दिव्या भोसले (दिघी), सौ.वसुधा नाईक (पुणे), पञकार सुनिल बिराजदार (सोलापूर), पोलीसकवी विनायक विधाटे (शिरुर), श्री सुनिल गायकवाड (जळगांव), श्री सुरेश सकटे (कोल्हापूर), श्री.राम जाधव (बुलढाणा), श्री.दिलीप विधाटे (मावळ), सौ.शाहिस्ता खान (यवतमाळ), सौ.रुपाली भालेराव (आकुर्डी), श्री.रामदास हिंगे(आळंदी) घेणार आहे.

या कार्यक्रमाचे बहारदार धारदार सूञसंचालन कवी वादळकार,पुणे हे करत आहे.

महाराष्टातील सुप्रसिदध कवी कवयिञी बोल्ड कवितांची मेजवानीची संकल्पना प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे (संस्थापक-राष्टीयअध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच )यांची आहे.