वंचित बहुजन आघाडी जालना शहराची महत्त्वाची बैठक संपन्न

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.10जुलै):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हाध्यक्ष पश्चिम डेव्हिड घुमारे, जिल्हाध्यक्ष जालना पूर्व भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या जालना नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यासाठी दिनांक ९/७/२०२२ रोजी दुपारी २ वा जालना जिल्हा संपर्क कार्यालय येथे पुर्व नियोजन आणि विशेष निर्णय निवडणूक जिंकण्यासाठी जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .

यावेळी जालना नगरपरिषद निवडणूक संदर्भात अनेक विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले तसेच नगरपरिषद निवडणूक प्रचार समिती नियुक्त करण्यात आली .लवकरच निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज आँनलाईन व्यवस्थित दाखल करावा असे पदाधिकारी यांना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी सांगितले.

यावेळी जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे, जिल्हाध्यक्ष महिला रमाताई होर्शिळ, जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव, जालना शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे, विद्या कैलास रत्नपारखी, जया आठवले, भाग्यश्री विलास निर्मळ, सोनी दुजवे, ऋषीकेश निकम, मनोज शर्मा, जितेंद्र दाभाडे, सुनील मगरे, आकाश जाधव, नितीन दांडगे, अक्षय निकम, किशोर जाधव, अमोल लोखंडे, सुमित राऊत, अर्जुन जाधव, अमोर कस्तुरे, हमीदखॉ दादामीयॉ यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED