फुलचिंचोली शाळेची नवोदय प्रवेशाची यशाची परंपरा अखंडित..

35

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.10जुलै):- केंद्रीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचिंचोली येथील अक्षत कुमार होनमाने या विद्यार्थ्याची निवड झाली.2005 पासून दरवर्षी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची निवड होते.ही परंपरा याही वर्षी अखंडित राहिली.यावर्षी विद्यार्थ्यांना श्रीम.अंजली ननवरे, श्याम खंदारे या वर्गशिक्षिकांनी मार्गदर्शन केले.तसेच सोमनाथ हिल्लाळ, नितीन पवार या ज्येष्ठ शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुरसेन बुधवंतराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत पाटील, उपाध्यक्ष समाधान प्रक्षाळे,सरपंच नारायण जाधव, उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे, बिभीषण वाघ, नागनाथ मोहिते, शहाजी पाटील,मारुती वाघ,शंकर दाजी गायकवाड, अशोक जाधव, डॉ. किलमिसे, रमाकांत पाटील, हणमंत काळे, नारायण गायकवाड,सदाशिव प्रक्षाळे,चंद्रशेखर जाधव, बाळासाहेब काटे,रमेश पापरकर, नामदेव काळे, ज्ञानेश्वर खुणे,नानासाहेब साळुंखे, केंद्रप्रमुख दोडमिसे, शिक्षण विस्तार अधिकारी मारुती लिगाडे, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेतील व केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले.