जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव (बे.) येथे शालेय मंत्रीमंडळाची निवड

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10जुलै):- गदगाव केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव (बे) येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली सर्व प्रथम विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळाचे महत्व सांगुन लोकशाही प्रमाणे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यासाठी वर्ग ८वी चा विद्यार्थी समीर वाघमारे यांची सर्वानुमते शालेय मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री वर्ग ७वीचा विद्यार्थी अभिजित गजभिये ,शिक्षण मंत्री वर्ग ६वीची विद्यार्थ्यांनी कु. अनुष्का गुडधे, क्रिडामंत्री अंश श्रीरामे वर्ग ५वा, सांस्कृतिक मंत्री कु. रविना गेजीक वर्ग ८वा, स्वच्छता मंत्री साहिल गुडधे वर्ग ८ वा, शालेय पोषण आहार मंत्री कु.श्वेता मडावी वर्ग ४था, वनमंत्री कु. ईश्र्वरी बुधे वर्ग ३रा, आरोग्यमंत्री कु. सृष्टी अरविंद गायकवाड वर्ग ८वा , पाणीपुरवठामंत्री समिर मेश्राम वर्ग ७वा या सर्व विद्यार्थ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी निरिक्षक म्हणून पांडूरंग मेहरकुरे यांनी जबाबदारी सांभाळली , कु. वंदना अमृतकर मॅडम यांनी उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले. मुख्याध्यापक संतोष चांदेकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व शालेय मत्र्यांना गोपीनियतेची शपथ दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बुजाडे व प्रकाश कोडापे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.