श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय द्वारा आयोजित शिवशंभु ऐतिहासिक राष्ट्रीय लेखी परीक्षा नाव नोंदणी 11 जुलै पासून प्रारंभ होत आहे..

27

महाराष्ट्रातील व संपूर्ण जग भरातील सर्व शिवभक्त यांना कळविण्यात आनंद होतोय की, अवघ्या शिवभक्तांचा लोकोत्सव समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष अभ्यासक्रम 11 जुलै पासून प्रारंभ होत आहे.. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले यांच्या ओजस्वी इतिहासावर आधारित ही राष्ट्रीय परीक्षा असणार आहे, या ऐतिहासिक परीक्षेचे रूपाने आपले शिवभक्त एकत्र यावे.. आणि *”मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा”*

या पंक्ती प्रमाणे काश्मीर ते कन्याकुमारी व बाहेरील देशात देखील श्री शिवराय शंभूराजे यांच्या वर आधारित ऐतिहासिक परीक्षा व्हावी, व आपल्या महापुरुषांचा तेजस्वी इतिहास समाजातील प्रत्येक घटक पर्यंत पोहचवणे हेच ध्येय समोर ठेऊन विश्वविद्यालयाची वाटचाल सुरू आहे..

या वर्षी भाषेचे पर्याय देण्यात आलेले आहे, विद्यार्थ्यांना आवडेल त्या भाषेत ते परीक्षा देऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे..त्या बरोबर योग्य अभ्यासक्रम मांडणी, मुद्दे सूद परीक्षा स्वरूप,प्रत्येक जिल्ह्यात 3-4 ठिकाणी परीक्षा केंद्र अश्या पद्धतीने समिती द्वारे पूर्व तय्यारी केली गेलेली आहे.. समितीचे महाराष्ट्र व राष्ट्रीय पातळीवर एकूण 500 पेक्षा जास्त सभासद कार्यरत आहेत, जे ह्या पवित्र कार्याला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत..माघील वर्षी कोरोनाच्या अवघड काळात देखील महाराष्ट्र भर 36 जिल्ह्यात 100पेक्षा जास्त परीक्षा केंद्रावर ऐतिहासिक परीक्षा सांस्कृतिक पोशाख परंपरा जपत यशस्वी झाली..

 

11 जुलै पासून प्रारंभ होत आहे, प्रवेश प्रक्रिया समितीच्या अधिकृत संकेत स्थळ.
WWW.RAIGADVISHWAVIDYALYA.COM या ठिकाणी online स्वरूपात अर्ज करायचा आहे..आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा अस स्वरूप असणार आहे..राष्ट्रीय पातळीवर पहिलं क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थीस “इतिहास श्री 2022” हा मानाचा खिताब दिला जाणार आहे..प्रथम व द्वितीय अभ्यासक्रम प्रारंभ होत आहे या ऐतिहासिक अभ्यासक्रमात जिल्ह्यातील युवक व नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय चे संस्थापक/अध्यक्ष रायगडपुत्र आकाश भोंडवे पाटील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समितीच्या जिल्हा प्रमुख संतोषी सुत्रपवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.