वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी चिमूर शहर भारिप-बहुजन महासंघाचे निवेदन

  40

  ✒️ चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चिमूर (2 जुलै) लाकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत असताना महावितरण कंपनीने तीन महिन्याचे सरासरी बिल ग्राहकांना पाठविले. लाकडाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे बिल कसे भरावे,असा प्रश्न निर्माण झाली आहे. वीज बिल माफ़ करण्याच्या मागणीसाठी चिमूर शहर भारिप बहुजन महासंघाचे वतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.
  उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारिप बहुजन महासंघ चिमूर चे अध्यक्ष विनोद सोरदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत राज्य शासनाने लाकडाऊन जाहीर केले. लाकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले,त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे,लाकडाऊन काळात विजेच्या बिलाची काळजी करू नये,असे शासनाच्या वतीने सांगितले जात होते, मात्र आता भरमसाठ बिलाचे देयक पाठविण्यात आले, ही चिंता सामान्य माणसाची झोप उडविणारी ठरली आहे.
  विदर्भात 70 टक्के वीज निर्मिती होते, या करिता विदर्भातील कोळसा,पाणी, जमीन वापरले जाते, विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण मिळत आहे, असे अनेक मुद्दे निवेदनात मांडले आहेत.
  लाकडाऊन मुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वीज बिल माफ करन्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
  निवेदन सादर करताना विनोद सोरदे, शालीक थुल, मनोज राऊत, आकाश भगत, संदीप बन्सोड, दिशान्त सोरदे आदी उपस्थित होते.