गुरुकुल नॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्साहात साजरा

28

✒️सीरसाळ प्रतिनिधी(अतुल बडे)

परळी(दि.10जुलै):-गुरुकुल नॅशनल स्कूल सिरसाळा येथे आषाढी एकादशी चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृष्णनाथ लहाने साहेब (चेअरमन), श्री शरद काका कदम, अमर भैया देशमुख, आणि प्रा. फुलारी सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री रुपनर सर तसेच नितीन जाधव सर यांच्या समवेत सर्व मान्यवरांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.गुरुकुल नॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

फुलारी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की भक्त पुंडलिक हा आपल्या आई-वडिलांची नितांत सेवा करायचा व पांडुरंगाची ही आराधना करायचा त्यामुळे आपल्या भक्ताला स्वतः भगवंत दर्शन देण्याकरिता आले. अखेर माता-पिता व गुरुजन हेच आपले भगवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे असे सांगून त्यांनी निरोप घेतला तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अशोक रुपनर सरांनी सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या व पांडुरंग व रुक्मिणी च्या वेशात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा गजर करीत पावली घेण्यात आली यावेळी परिसरातील पालकांनी चांगला प्रतिसाद दिला व शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी केला.