शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा देशमुख यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनंदन

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.11जुलै):- शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनदादा देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट व सामाजिक कार्यातील योगदाना बदल पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ आदरणीय हर्षवर्धनदादा देशमुख यांना देण्यात आला त्या बद्दल त्यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परिवारातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील पदवीदान सभागृहात आयोजित भव्य समारंभात राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्री.हर्षवर्धनदादा देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आला.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून श्री.हर्षवर्धन देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात संस्थेच्या माध्यमाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे. या पुरस्काराबद्धल राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक अनिरुद्ध होले, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मनोज गावंडे, फुबगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मेश्राम यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED