कोरोना काळात काम केलेले वैद्यकीय अधिकारी यांच्या नोकरीवर चालवली जाणार आरोग्य विभागाकडून कुऱ्हाड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11जुलै):-सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्यात 2019 पासून सुमारे 1400 BAMS वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण भागात मुख्यालयी राहुन कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेत उत्तम कार्य पार पाडले व आजपर्यन्त पार पाडत आहेत. मागील वर्षी जुन महिन्यात रातोरात मंत्रिमंडळ निर्णय घेऊन राज्य शासनाने कोरोना दोन्ही लाट संपल्या असतानाही 1899 MBBS राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ यांना कोणताही शासकीय अनुभव नसताना कोणतीही MPSC सरळसेवा मुलाखत न घेता टक्केवारी च्या अनुक्रमाणे भरती केली व प्राथमिक आरोग्य केंद्रातील BAMS वैद्यकीय अधिकारी यांना नोकरीवरून घरी पाठवले या विरुद्ध मा. उच्च न्यायालय मुंबई येथे याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

तसेच या वर्षी 2022 मध्ये DMRE बॉण्ड च्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या जवळपास 500 BAMS वैद्यकीय अधिकारी यांना येणाऱ्या 10 दिवसात घरी पाठवण्याचा घाट रचला असून सदरील ठिकाणी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र ठिकाणी कार्यरत असतानादेखील रिक्त पदे दाखवली असून या बाबत ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी ऑल इंडीया महाआयुष असोसिएशन मार्फ़त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे करण्यात येणार आहे न्याय न मिळाल्यास डॉक्टरांना आमरण उपोषण हाच मार्ग स्वीकारावा लागेल तरी यावर मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED