हिरापूरच्या पुलावर मृत अर्भक आढळले

🔸अवैध गर्भपात प्रकरण ताजे असताना पुन्हा धक्कादायक प्रकार

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

बीड(दि.11जुलै):-राष्ट्रीय महार्गावरील हिरापूरच्या पुलावर अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज (दि.१०)सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत एका लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृत अर्भक पडले होते. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.

हे अर्भक कोणी टाकले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. अर्भकाच्या अंगावर खोलवर जखमा हाे्‍त्‍या. पोलिसांशी संपर्क केला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED