संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,यांच्या वतीने दिनेश महाजन यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

🔹समाजसेवा हाच मानवता धर्म – दिनेश महाजन

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.11जुलै):- अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाजन यांची धरणगांव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.जळगाव येथील माळी भवन खोटेनगर येथे संघटनेच्या जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

त्या प्रसंगी अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भाऊ गुलदगड व प्रदेश अध्यक्ष जितेन्द्र भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार विभागीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.मला दिलेली जबाबदारी मी निस्वार्थपणे पार पाडेल. समाजसेवा हाच मानवता धर्म आहे असे प्रतिपादन दिनेश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED