सुनगाव येथील पहिली पीएसआय होण्याचा मान मिळविणाऱ्या कु.निता दामधर हिचा गावकऱ्यांनी केला सत्कार

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगांव(दि.11जुलै):-ओबीसी मागासवर्गीय समाजातील गरीब कुटुंबातील मुलगी अतिशय खडतर प्रवास करत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचली. ज्यामुळे तिचा संपूर्ण गावाला गर्व झाला आहे. नीता दामधर ही सुनगांव तालुका जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा येथील अंगणवाडी सेविका गीताबाई दामधर यांची कन्या असून, गिताबाई हिने आपल्या मुलींसाठी जीवाचे रान करीत एक मुलगी कर निर्धारण अधिकारी तर दुसरीला पोलीस उपनिरीक्षक करून गावाचे नाव मोठे केले म्हणून सुनगाव येथील ग्रामस्थांनी दिनांक 30 जून रोजी उत्स्पुर्तपणे भव्य असा नागरी सत्कार केला आहे. तो जिल्ह्यातील गरीब विध्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

यावेळी या सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले तर प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, उपसरपंच सगिराबाई तडवी, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, गिताबाई दामधर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे,माजी जिल्हा परिषद सदस्या रूपालीताई काळपांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेवराव धुर्डे, माजी पंचायत समिती सभापती पंचफुलाताई वंडाळे, कृषी सहायिका ढाकुळकार, प्रिया दामधर, तलाठी केदार, पोलीस पाटील मीनाताई तडवी, जळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक कोकाटे सर, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांची उपस्थिती होती.

यावेळी सुनगाव गावकऱ्यांच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या नीता दामधर हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पीएसआय नीता हिने सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत राऊत यांनी केले तर प्रास्ताविक प्रवीण धर्मे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त होणारे तलाठी केदार व शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन तसेच गावामध्ये कृषी विषयक महत्त्वाचे कार्य केल्याबद्दल कृषी सहायिका ढाकूळकार मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला मा. जी. प. सदस्य सुरेख अंबडकार, अशोक काळपांडे, माजी सरपंच सखुबाई येऊल,कृषी मित्र मोहनसिंह राजपूत,प्रवीण भगत, गावातील पत्रकार बांधव, उमेश कुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, उत्तम ढगे, ग्राप सदस्य प्रिया कुरवाडे, माजी ग्राप सदस्य पांडुरंग गवई, अंगणवाडी सुपरवायझर गीता मावस्कर, रामेश्वर ठोसर,विजु वंडाळे, परशराम येऊल,सर्व अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते व पदाधिकारी व ग्रा. प. कर्मचारी, आशा सेविका आवजिसिध्द महाराज संस्थान चे संचालक मंडळ यांच्यासह समस्त सूनगावासियांची यावेळी उपस्थित होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED