हा भारतीय संविधानाचा अपमान, राष्ट्रपती राजवट लावा

28

🔸डेमोक्रॅटिक रिपाई च्या पॅन्थर डॉ. माकणीकर यांची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.11जुलै):- मा. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना या सरकारला मान्यता मिळाली अन पुढील कार्यकाळ पूर्ण करण्याची मुभा दिली तर ही घटना भारतीय संविधांनाचा अवमान ठरेलं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.*

भारतीय संविधानाचा अवमान होऊ नये याकरिता जोपर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणी जोपर्यंत सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी असे मत पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक लढवय्या संघटने चे संस्थास्पक महासचिव विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

डॉ. माकणीकर हे मागील 10 वर्षांपासून भारतीय संविधान जनजागृती व साक्षरता अभियान राबवत असून आतापर्यंत त्यांनी लाखांच्या वर उद्देशिका फ्रेम चे वाटप केले आहे. लग्न समारंभ, समाजिक कार्यक्रमात हजारो संविधान पुस्तिके चे वाटप केले आहे. देशातील सर्व राज्याच्या सरकारांनी माध्यमिक शिक्षणात पूर्ण *भारतीय संविधान* हा विषय सक्तीने शिकवण्यात यावा अश्या मागणीचे पत्र आजपर्यंत 385 सरकारी लोकप्रतिनिधिना दिले आहे.