दर सोमवार ला ब्रम्हपुरी शहरातील सलुन दुकान राहणार बंद

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12जुलै):-नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने दि.11 जुलै 2022 ला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेच्या अध्यक्षस्थानी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी चे मुख्य मार्गदर्शक अजय खळशिंगे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी सलुन असोसिएशन चे अध्यक्ष सुरज कुंडले, नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत फुलबांधे , उपाध्यक्ष श्रावण येळणे, उपाध्यक्ष विलास दाणे, प्रवक्ते पितांबर फुलबांधे, सहसचिव मयूर मेश्राम प्रा. लक्ष्मण मेश्राम सर हे उपस्थित होते.सदर सभेमध्ये सर्वप्रथम मागील सभेचे अहवाल वाचन करण्यात आले.

त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या सर्व नाभिक समाजाच्या वतीने दर सोमवार ला सलुन व्यावसाय बंद राहतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.जर कोणी नाभिक युवा आघाडी संघटनेच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन सलुन दुकान सुरू ठेवल्यास त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने देण्यात आला .ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरिता सदर प्रसिद्धी पत्रक संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे.तरी सर्व ग्राहकांना कळविण्यात येत आहे की,दर सोमवार ला सलुन दुकान बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.सदर सभेला बहुसंख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते.