वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या

43

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(2जुलै):-पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर जवानानेही स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील या खळबळजनक घटनेने संपूर्ण वर्धा हादरला आहे.

अजय कुमार सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे, तर प्रियांका कुमारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली. घरी आल्यानंतर अजय कुमार याने सर्व्हिस गनने पत्नी प्रियांका कुमारीवर गोळ्या झाडल्या. तिच्या हत्येनंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रियांकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अजय कुमारला रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. अजय कुमार आणि प्रियांका कुमारी हे दोघेही मूळचे बिहारचे आहेत. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.