पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या त्या शेतकऱ्याचा मृतदेह निलज घाटावर आढळला

🔸चंद्रपूरच्या बचाव पथकाला तब्बल 18 तासानंतर आले यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12 जुलै):-बेटाळा येथील शेतकरी नवलाजी पांडुरंग तुपट(56) हा रविवारला सायंकाळी 3 वाजता च्या सुमारास बेटाळा रनमोचन याच्या मधोमध असलेल्या भुतीनाल्याचे पाणी ओलांडून जात असताना अचानक पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे वाहून गेला असल्याची माहिती घरच्यांना कळतातच लगेचच घरच्यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली व गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनालाही कळवण्यात आले त्यानुसार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

सोबतच मंडळ अधिकारी भाकरे यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली नंतर चंद्रपूर वरून बोट बोलावले शोध मोहीम पथकाच्या वतीने दिनांक 11 जुलै सायंकाळी 3:30 वाजताच सोमवारला मृतदेह शोधण्याला सुरुवात करण्यात आली मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र त्यानंतर अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली

मंगळवार ला सकाळी 7 वाजता पासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र तब्बल 24 तासानंतर ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज घाटावर आज दुपारी 2:30 वाजता मृतदेह वैनगंगा नदी पात्रात आढळून आला मृतदेह शविचछेदनाकरीता ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.यावेळी स्थानिक प्रशासनातील पदाधिकारी पोलीस कर्मचारी कुटुंबीय नातेवाईक व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED