


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
यवतमाळ(दि.12जुलै):-यवतमाळच्या अध्यक्षपदी श्रीमती ज्योती अशोक येरावार तर उपाध्यक्षपदी सौ. मनिषा प्रदिप कुळकर्णी यांची निवड करण्यात आली.
बॅंकेच्या मुख्य कार्यालयात आज मंगळवारी ही निवडप्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सचिनकुमार कुळमेथे यांची उपस्थिती होती.
निवड झालेल्या अध्यक्षा श्रीमती ज्योती येरावार हया बॅंकेच्या प्रवर्तक संचालीका असुन त्यांना बॅंकेच्या सुरवातीच्या 12 वर्षाच्या उपध्यक्षपदाचा पुर्वानुभव आहे. उपाध्यक्षा झालेल्या सौ मनिषा कुळकर्णी या कायदेतज्ञ असुन सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
नवनिर्वाचित संचालिका सौ. प्रिया प्रविण किडे, सौ. निधि नितिन भुतडा, सौ. देवयानी दिलिप अलोणे, सौ. निलु सुमित बाजोरीया, सौ. निलिमा संजय मंत्री, सौ. अपराजीता किशोरकुमार चोखाणी, सौ. दिपिका दिलीप गंगमवार, सौ. मनिषा मनोज पांडे, सौ. प्रणिता राजेष पडगिलवार, सौ. हरप्रितकौर जगजितसिंग ओबेराय, सौ. किर्ती भरतकुमार दत्ताणी, सौ. वर्षा संजय पिंपळखुटे, सौ. अंजली राजु चिंडाले, श्रीमती उज्वला विनय भाविक, सौ. आशा दिपक गिरी यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या बॅंकेला लवकरच गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वानी सचोटीने कार्यकरण्याची शपथ घेतली.
निवड प्रक्रियेनंतर आ. मदनभाऊ येरावार, जगजितसिंग ओबेराय, सुमित बाजोरीया, अजयजी मुंधडा, अध्यक्ष दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बॅंक, चंदु बिडवाई, विजयराव कद्रे, नितिन भुतडा, प्रशांत माधमशेट्टीवार, अमोल येरावार व बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुजाता विलास महाजन यांनी नवनियुक्त अध्यक्षा, उपाध्यक्षा व संचालिकांचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन व स्वागत केले.




