बंगलोर आंतरराष्ट्रीय उच्च विद्यापीठात तुमसरचा राजा बोबार्डेची निवड

26

✒️तुमसर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

तुमसर(दि.13जुलै):- शहरातील एका सर्वसामान्य कूटूबांत जन्मलेल्या बिडी कामगाराचा मुलगा मित्राच्या रूमवर अभ्यास करून आपल्या कर्तूत्वाच्या बळावर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेपर्यंत तुमसर येथिल राजा बोबार्डे नामक विद्यार्थ्यांने मजल मारली असून त्याची बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय अजीम प्रेमजी विद्यापीठात एम.ए.एज्युकेशन या प्रतिष्ठित अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

तुमसर येथिल राजा दिनेश बोंबार्डे आंबेडकर नगरातील एका बिडी कामगाराच्या गरीब कुटुंबातील मुलगा ,आई वडिलांच्या मार्गदर्शनाने तुमसर येथील प्राचार्य डॉ.सच्चीदानंद फुलेकर विद्यालय तुमसर येथे पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला दरवर्षी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत असतांना त्याने क्षेत्र कार्य आणि इतर उपक्रमात आपली वेगळी छाप उमटवली. सोबतच पदव्यूत्तर अभ्यासक्रम देशातील नामवंत संस्थेतून पूर्ण करण्यासाठी त्याने मित्राच्या रूम वर अभ्यास करून कठोर मेहनत सुद्धा सुरु ठेवली.

महाविद्यालयात आणि खास करून उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा विषयक विशेष मार्गदर्शन करणाऱ्या ‘एकलव्य’ संस्थेचे विशेष साह्य सुद्धा त्याला मिळाळे. आता नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार राजा ची बंगलोर येथील अजीम प्रेमजी विद्यापीठातील एम. ए.एज्युकेशन या प्रतिष्टीत अभ्यासक्रमासाठी देशभरातून निवड झाली असून त्याने आपल्या निवडीचे श्रेय फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना व आपल्या कुटुंबियांना दिले आहे.व त्याला प्रतीक होले,गोपाल गहाणे,श्वेता मॅडम, अंजेला मॅडम हे मार्गदर्शक म्हणून लाभले. तर त्यांच्या निवडीबद्दल मित्रांनी अभिनंदन केले.

——-@——-

आमचे अनेक विद्यार्थी मित्र परिस्थितीला दोष देतात की माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी हे केलं नाही ते केलं नाही मित्रांनो परिस्थिती ही माणसाला सुधरवीत ही नाही आणि बिघडवीत ही नाही माणूसच परिस्थिती सुधरवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका ध्येय पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहा आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

राजा दिनेश बोंबार्डे