भीमा कोरेगाव प्रकरण 27 जनांना 5 वर्षे शिक्षा व प्रत्येकी 21 हजार दंड व वकीलांची भुमीका – दादासाहेब शेळके

52

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

नांदेड- हदगाव(दि.13जुलै):-1जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव येथे जातीवादयानी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भिम टायगर सेनेच्या वतीने तामसा ता. हदगाव येथे बंद पुकारण्यात आला होता.

तेव्हा भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते व इतर समाज बांधवावर तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले होते.

त्या गुन्ह्याचा निर्णय दि.11 जुलै रोजी 2022 नांदेड सेशन कोर्टाने दिला असून असून 27 भीमसैनिकास पाच वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 21 हजार रुपयांचा दंड लावला आहे.

तसेच सर्वांना तात्काळ अटक करुन औरंगाबाद येथील तुरुंगात वाट लावले आहे.
हा निर्णय माझ्यासह समाज बांधव व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आहे.

पण शेवटी कोर्टाचा निर्णय त्या निर्णयाचा आदर करुन आम्ही सर्वजण भीम सैनिकाना बाहेर काढण्यासाठी तात्काळ औरंगाबाद येथील हायकोर्टात अपील करणे आवश्यक होते.

त्यासाठी सेशन कोर्टातुन स्टेटमेंट, जजमेंट इ. कागदपत्रे काढणे चालु असुन हायकोर्टात कोणत्या वकीलाकडे जायचे 27 जनांचा किती खर्च येणार? वकील किती पैसे घेतील ? हा विचार आम्ही सर्वजण करत होतो.

रात्री अंदाजे आठ वाजता सत्तावीस भीमसैनिकांना पोलीस घेऊन गेले तेंव्हा आम्ही सर्वांनी 27 भीमसैनिकास कोर्टातुन निरोप दिला.

त्यानंतर मी माझ्या गावाकडे जात असताना अंदाजे 10 वा. हदगाव तालुक्याचे भुमीपुत्र विधीज्ञ ऍड.नामदेव सावंत साहेब मो.न.9545735769 ज्यांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात भीम टायगर सेना स्थापन करण्यासाठी मदत केली होती.

त्या ऍड.नामदेव सावंत साहेबांचा फोन आला दादासाहेब मी आत्ताच भीमा कोरेगाव संदर्भातील बातमी वाचली आहे.

काही काळजी करू नका मी स्वतः आणि एडवोकेट मधुकरर परघणे साहेब आम्ही दोघे मिळून 27 जणांची केस हायकोर्टात शेवट पर्यंत मोफत लढविणार आहोत.

असा त्यांनी धीर दिला तेव्हा डोक्यावरून ओझं उतरल्यासारखं वाटले होते.

मग मी ही बातमी लागलीच सर्व भीमसैनिकाच्या नातलगाला फोन द्वारे दिली एड.सावंत साहेबांचा हा मेसेज मिळाल्या नंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदर्भ आठवला 31जुलै 1956 रोजी नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांना विचारतात बाबासाहेब आपण अलीकडे एवढे दुःखी, चिंताग्रस्त आणि खिन्न का दिसता तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाण्यानी भरलेल्या डोळ्यांनी म्हणतात मी जे काही मिळू शकलो त्याचा फायदा समाजातील शिकलेल्या लोकांनी उचलला पण सामाजिक बांधिलकी मात्र विसरलेले आहेत.

त्यांचे विश्वासघातकी वागणे समाजाबद्दल त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले आहेत. त्यांना समाजाचे काही देणे घेणे नाही.ते आपली लेकरे बायको घर आणि वैयक्तिक कामासाठी जगत असतात.

माझ्या खेड्यातील बांधवाची परिस्थिती अजूनही सुधारले नाही त्यांचे कसे होईल हि चिंता बाबासाहेबांनी व्यक्त केली होती.
पण आज खऱ्या अर्थाने ऍड.नामदेव सावंत साहेब व ऍड.मधुकर परघणे साहेब यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आम्हाला मिळाले आहे.

अशा व्यक्तीला समाजाने तळ हातावरल्या फोडाप्रमाणे जोपासले पाहिजे बाकी खंडीभर आहेत पण काय कामाचे ऍड सावंत साहेब, ऍड. परघणे साहेब हाई कोर्ट औरंगाबाद. यांचे धन्यवाद मानले.

अशी माहिती सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना मा.दादासाहेब शेळके) मो.8766744644 यांनी आमच्या प्रतिनिशी बोलतांना दिली.