कनैय्या ऊर्फ चि. रियांश बोडखेच्या भक्तिमय अदाकरीने उपस्थित आवाक

🔹आष्टीचा सात महिन्याचा कनैय्या झाला वारकरी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13जुलै):-‘अत्तर सुगंधी व्हायला, फुले सुगंधी लागतात!’ एखाद्या कुटुंबातील लहान मुले अध्यात्मिक क्षेत्राकडे वळण्यासाठी त्या परिवारातील जेष्ठ जन त्या क्षेत्रात असणे गरजेचे आहे. आषाढी एकादशीच्यानिमित्ताने सर्वत्र सुगंधी परमार्थिक वातावरणाने आसमंद दरवळून गेला होता. अशातच आष्टीच्या चि. कनैय्या उर्फ रियांशने आपला वेगळा लुक आणि अदाकारी करून उपस्थितांना गोड धक्का दिला.

त्याचे झाले असे की, आषाढी एकादशीनिमित्त सबंध महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा महिमा प्रत्येकाच्या रोमारोमांत भिनला होता. बालगोपाळासहित ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी उपवास करून विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र पायावर नतमस्तक होण्यात धन्यता मानली. अगदी याच पवित्र दिवशी आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे नातू चि. रियांस उर्फ कनैय्या राकेश बोडखे वय वर्ष अगदी सात महिने… आणि या वयात वारकऱ्यांचा सुंदर पेहराव परिधान करून विठ्ठलाच्या सुंदर भाव आणि भक्ती गीतावर जेव्हा त्याने सुंदर ठेका धरला… तेव्हा उपस्थितानाही सुखद धक्का बसला. चि. कनैय्या उर्फ रियांश या चिमुकल्याच्या एवढ्या छोट्या वयातील अध्यात्मक क्षेत्राशी निगडित या कृतीने त्यांच्या कौटुंबिक आध्यात्मिक परमार्थिक वातावरणाचा भविष्यात ही यशस्वी वाटचालीचा प्रवास अधोरेखित झाला म्हणावा लागेल.

दरम्यान अंत:करणाचे औदार्य, सदगुणांची संपदा आणि नररत्नाची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणाऱ्या या देशात महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. समता, बंधुत्वाची ही पवित्र भूमी संतांच्या विचार कार्याने कायम पवित्र राहो…’ अशी भावना यानिमित्ताने जेष्ठ मराठी वाडःमय अभ्यासक प्रा. बिभिषण चाटे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED