50 वर्ष जुन्या जीर्णावस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीपासुन विद्यार्थ्यांचे जीवितास धोका-शाळा व्यवस्थापन समितिचे तहसीलदारला निवेदन

31

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14जुलै):-जिल्हा परिषद लगत असलेल्या 50 वर्ष जूनी जीर्णावस्तेत असलेल्या पाण्याच्या टाकीमुळे विद्यार्थ्यांचे जिवाला धोका असल्यामुळे ही टाकी पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती द्वारा तहसीलदार प्राजक्ता बुरांडे याणा देण्यात आले.

नगरपरिषद हदीतील अभ्यंकर मैदान येथील 1972 साली निर्माण केलेली पाण्याची टाकी ही जीर्णावस्थेत असून आता पावसाळा सुरु असल्यामुळे 10 जुलाई रोज रविवारला पाण्याच्या टाकीच्या जिन्याच्या पूर्ण पायऱ्याचा भाग शाळेच्या दिवालीला लागून पडला, व भींत हादरली, रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांची जीवित हानी ठळली, पाण्याच्या टाकीला लागुनच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुले ही 1 ते 4 वर्गाची लहान मुलांची शाळा भरते, पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण झाल्यामुळे वारंवार त्यांचे प्लास्टर शालेय इमारतीव्र कोसलने सुरु आहे.

त्यमुळे लहान मुलांच्या जीवितास 100℅ धोका निर्माण झाला आहे, या परिस्थिति बाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन अवगत करण्यात आले आहे, तेव्हा परिस्थितिचे गाम्भीर्य लाक्षत घेऊन ताबड़तोड़ कार्यवाही करावी अस्या आशेचे निवेदन देण्यात आले आहे,यावेळी शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते, लक्ष्मीकांत बावनकर, प्रमोद हिंगे, किरण सातपुते, मोहनीश जुमड़े, अशोक मेश्राम, सौ, सोनू बावनकर, सौ, दीपाली बावनकर, व इतर पालक वर्ग उपस्थित होते,