प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार व आयुक्तांचा सन्मान

🔸गुरुपौर्णिमा निमित्त पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.14जुलै):- गुरुपौर्णिमा निमित्त ज्येष्ठ पत्रकार पंढरी प्रहर साप्ताहीकाचे संपादक माधव सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी, पत्रकारीतेतील युवा नेतृत्व सुरज कसबे, वृत्तपत्र क्षेत्रात अनेक वर्ष योगदान दिलेले अनिल दळवी यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने सन्मान करण्यात आला.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील तसेच अतिरीक्त आयुक्त उल्लास जगताप यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने गुरु पौर्णिमा निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आयुक्त राजेश पाटील यांनीआपल्या चिकाटीने अभ्यासू वृतीने कठोर परीश्रम घेत संघर्षमय जीवनावर मात करुन उच्च शिक्षण घेतले व प्रतीकुल परिस्थितवर मात केली, याचा प्रत्यय “ताई मी कलेक्टर ह्यनु “या पुस्तकातुन येतो. लहानपणापासुन कलेक्टर होईपर्यंतचा जीवनप्रवास पाहताना सद्याच्या युवकांना प्रेरणा मिळते.तसेच अतिरीक्त आयुक्त उल्लास जगताप यांचा जीवन प्रवासही खडतर आयुष्य, कठोर परिश्रम व चिकाटीने झाला.

त्यांच्या या कर्तुत्वाची दखल घेऊन गुरुपौर्णिमा निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त उल्लास जगताप यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा मंदा बनसोडे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर यांनी केले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष रणसिंग, महिला अध्यक्षा मंदा बनसोडे, उपाध्यक्षा उषा लोखंडे, सह सचिव निर्मला जोगदंड, सचिव संजिवन कदम, सदस्य राहुल बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED