लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14जुलै):-स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याला हाताशी धरून ब्रम्हपुरी तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधीने महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याचे प्रकरण पुढे आले असून तसे शपथपत्रच ‘त्या’ महिला कर्मचारीने ‘ब्रम्हपुरी ब्लास्ट ला दिले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील एका विभागात नौकरी करणाया ‘त्या’ महिला कर्मचारीने माजी लोकप्रतिनिधीची मागणी धुडकावून लावली त्यामुळे कासावीस झालेल्या लोकप्रतिनिधीने त्या विभागातील तालुक्याच्या प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याला हाताशी धरून तिचा अनन्वीत छळ सुरु केला. गावातील काही टपोरी व बेवड्या युवकांना रात्री बेरात्री तिच्या निवासस्थानी पाठवून तिला त्रास देणे सुरु केले.

हा त्रास असह्य झाल्याने त्या महिला कर्मचारीची आई बिमार होऊन मरण पावली. लोकप्रतिनिधी असल्याचा गैरफायदा घेऊन अधिकाऱ्याच्या संगनमताने महिला कर्मचारीचा छळ करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधी व त्याला या कामात सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी जनसामान्यांची मागणी असून छळ सहन केलेल्या त्या महिला कर्मचारीने मनावर घेतले तर दोघावरही निश्चितच कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलल्या जात आहे.