राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.१४जुलै):- मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून यावेळी प्रदेश अध्यक्ष विद्या ताई चव्हाण, प्रदेश विभागीय अध्यक्ष वैशाली ताई नागवडे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारती ताई शेवाळे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती केल्याबद्दल शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई सुळे,अजितदादा पवार, पार्थ दादा पवार,आमदार सुनील अण्णा शेळके व सर्वच पक्षश्रेष्ठींचे शितलताई हगवणे यांनी आभार मानले तसेच पक्ष श्रेष्टीनी जी जबाबदारी दिली आहे त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED