ओला दुष्काळ जाहीर करा….

30

✒️पांडुरंग शिंदे(नांदेड प्रतिनिधी)

नांदेड(दि.15जुलै):-जिल्ह्यात ०४ जुलै पासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , पीक नुकतेच उगवले असताना अतिरिक्त पाण्यामुळे जागेवर पीक सडून जात आहेत. जनावरे दगावलेले आहेत आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नद्या नाल्या काठच्या शेतकऱ्याची शेत जमीन वाहून गेली आहे.त्यामुळे शेती नापीक होणार आहे. शेतकरी ,शेतमजूर गाव- गड्यातील लोक कोलमाडून गेलेले आहेत.त्याना आधार देणे सरकारचे काम आहे, त्यामुळे नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावे व जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबातील १ लाख रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली.

पांडुरंग शिंदे यांनी आज नायगाव तालुक्यातील वजीरगाव, सोमठाणा, कोलंबी ,मांजरम ,बेंद्री आणि मुगाव येथील गावाला व शिवाराला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची आणि घरांची पाहणी केली व उपस्थित असलेले शेतकऱ्यांची संवाद साधला.

यावेळी पांडुरंग शिंदे प्रत्येक गावातील तलाठ्यांना फोन करून पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाजी कदम ,युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, प्रल्हाद बैस,विजय बैस,भास्कर गायकवाड,गजानन ढगे, शिवाजी गायकवाड आणि प्रत्येक गावातील नागरिक, युवा कार्यकर्ते, सरपंच ,उपसरपंच उपस्थित होते.