उठा, जागे व्हा! विदर्भ वीरांनो ही झोपण्याची वेळ नाही!!

विदर्भ राज्याच्या बळीराजावर सतत अन्याय होत आहे,म्हणून विदर्भ चंडिका माता विदर्भ विरानो आपनाला उठवत आहे आव्हान करत आहे उठा जागे व्हे ही झोपण्याची वेळ नाही,आता तुम्ही झोपाल तर भावी पिढीला न्याय मिळणार नाही.विदर्भाच्या सुपुत्रांनो शेतकरी कष्टकरी माय-बापानो युवक मित्र-मैत्रिणींनो उठा हीच योग्य वेळ आहे जागे होण्याची विदर्भवाद्यांनो तुम्ही झोपलात तर शंभर टक्के रोजगार बंद होईल.आपण झोपलो तर आपल्या हक्काचा स्वतंत्र विदर्भ राज्य होणार नाही.विदर्भ राज्य स्वतंत्र झाला नाही तर विदर्भातील ०३ कोटी जनतेचा विकास होणार नाही,विदर्भातील 33 लहान-मोठे धरणे पूर्ण होणार नाही.धरणे पूर्ण होणार नाही तर सिंचन सुद्धा विदर्भात पूर्ण होणार नाही,विदर्भ राज्य नाही झालं तर विदर्भातील तरुणांना रोजगारासाठी वन वन भटकावे लागेल.विदर्भ राज्य नाही झालं तर , महागाई पूर्णपणे जनसामान्यांच्या खिसा पूर्णपणे खाली करेल.मग विदर्भातील जनतेची अवस्था घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा अशी होईल.”मग आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊया आणि स्वतंत्र विदर्भ राज्य घेऊया”.

जो पर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे किंवा घराचे पट्टे मिळणार नाही.विदर्भ राज्य नाही झाले तर शेतकऱ्यांच्या हक्काचे स्वामिनाथन आयोग लागू होणार नाही,जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तो पर्यंत मोठं-मोठे उद्योग-व्यापार विदर्भामध्ये येणार नाही आणि त्याशिवाय विदर्भातील जनतेचा जगणे मुश्किल आहे.विदर्भ राज्य जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विदर्भातील विद्यार्थ्यांना शुल्क दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळणार नाही,सर्व सामान्य जनतेला योग्य दर्जेदार आरोग्याची सोय उपलब्ध होणार नाही,सर्व सामान्य शेतकऱ्यांना १०० % घरकुल मिळणार नाही,विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठ व मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज होणार नाही.

*विदर्भ राज्य झाले तर* विदर्भातील १००% बाल मृत्यू आणि बाल कुपोषण आणि माता मृत्यू माता कुपोषण पूर्णपणे कमी होणार, १००% उच्च दर्जाचे आरोग्य व शिक्षण प्राशन करण्यास विदर्भातील जनतेला मिळेल,विदर्भातील १०० % बेरोजगारी संपेल व विदर्भातील युवकांना १०० % रोजगार मिळेल.विदर्भ राज्य झाले तर १००% नवीन उद्योग निर्मिती होणार, ३०० युनिट वीज मुफ्त मिळणार व त्यापेक्षा जास्त युनिट असल्यास निम्म्या किमतीत १००% वीज मिळणार.विदर्भातील जनतेला शेतीचे व घराचे पट्टे १००% मिळणार,
विदर्भ राज्य झाले तर तेलंगाणा आणि दिल्ली च्या धर्तीवर नव्याने विदर्भाचा विकास होईल.विदर्भातील शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीमध्ये रासायनिक खते व जैविक खते व शेतीविषयक अवजार सामान्य शेतकऱ्यांना १००% मिळेल.विदर्भ राज्य झाले तर बळीराजाचे राज्य नक्की येणार. १००% नवीन ग्रामपंचायत निर्मिती होतील त्यामध्ये विदर्भातील सर्वसामान्य माणूस सरपंच, उपसरपंच,सचिव, सदस्य बनेल.विदर्भ राज्य झाले तर १००% पंचायत समिती, जिल्हापरिषद,महानगरपालिका,नगरपंचायत नव्याने उदयास येतील आणि या सर्व इमारतीची निर्मिती होणार मग याठिकाणी पण विदर्भातीलच युवकांना रोजगार मिळेल आणि अध्यक्ष महापौर,सभापती म्हणून पदे भूषविता येणार.

विदर्भ राज्य झाले तर मोठ्या प्रमाणावर नव्याने ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन,पशुवैद्यकीय रुग्णालय,शिक्षण संस्था,मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज,कृषी विद्यापीठे, मोठं मोठे उद्योग निर्माण होईल मात्र यातून सर्व विदर्भाचा विकास होणार आणि मोठ्या प्रमाणावर विदर्भातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल.
म्हणून शेतकरी कष्टकरी माझ्या प्रिय विदर्भवीरांनो उठा जागे व्हा आणि विदर्भ राज्य निर्मिती साठी सर्व एकत्र येऊन मोठा लढा उभारू या आणी आपल्या हक्काचे विदर्भ राज्य मिळवून घेऊया आणि भावी पिडीच्या उज्वल भविष्य आपण सर्व मिळून घडवून देऊया,लाख युवा विदर्भ प्रदेश नवा विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भवीरांनो एक जुटीने पुढे या हे सुदाम रामराव राठोड एक शेतकरी पुत्राचा सर्व विदर्भातील जनतेला आव्हान आहे.*माझा जन्म जरी महाराष्ट्रात झाला असेल तरी मी मरणार मात्र स्वतंत्र विदर्भ राज्यातच*.

✒️सुदाम रामराव राठोड(युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुखविदर्भ राज्य आंदोलन समिती)मो:;9370092598,9158101895
ई-मेल-sudamrathod3755@gmail.com

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED