कृषीकन्यांची यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट

34

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 15जुलै):-डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत येत असलेल्या कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्रातील कृषी कन्या कु.निशा समाधान मोहाडे , कु. वैष्णवी बाबाराव महल्ले, कु. श्रुती विलास कानडे, कु. जयश्री महेंद्र खांडरे , कु. ऋतुजा सतिश देऊळकर, कु.स्नेहल महेशराव भोयर व कु.शितल कृष्णा चव्हाण यांनी यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र येथे भेट देऊन तेथील विषय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. त्याचप्रमाणे शेती उपयोगी नवनवीन प्रगत झालेले तंत्रज्ञान व त्यांचा उपयोग आधुनिक शेतीमध्ये कसा करता येईल, याबदद्ल मार्गदर्शन घेतले.

तेथील प्रात्याशिक पाहून कमीतकमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल, याचे आकलन कृषीकन्या कडून करण्यात आले.

तेथील प्रात्याक्षिक म्हणून आझोला निर्मिती क्षेत्र याचा पशुखाद्य म्हणून दुध उत्पादन वाढविण्यासाठी उपयोग कसा करावा, याचे धडे तज्ज्ञांकडून कृषीकन्याना देण्यात आले. तसेच गांडूळ खत निर्मिती कशी करावी, याचे आकलनही कृषी कन्यानी केले.

यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेडचे प्राचार्य एस. के. चिंतले, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे अधिकारी प्राध्यापक ए. बी. तामसेकर व अर्थशास्त्र विभागाचे विषय तज्ज्ञ प्राध्यापक अनिल इंगळे यांचे मार्गदशन लाभले.