अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी

🔸संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांची मागणी

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वर्धा(दि.16जुलै):- मागील आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड चे नेते तथा जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष पियुष रेवतकर यांनी केली आहे.

चालू खरीप हंगामामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते, काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती, मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती, परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, लहान ओढे, नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांनी केली .

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED