कृषि कन्यांनी राबविला बीजप्रक्रिया प्रकल्प

45

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.16जुलै):-ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी उमरखेड तालुक्यातील शेत शिवारात बीजप्रक्रियेचा विशेष प्रकल्प राबविला.

यावेळी कृषीकन्या निशा मोहाडे, वैष्णवी महल्ले, श्रुती कानडे, जयश्री खांडरे,ऋतुजा देऊळकर, स्नेहल भोयर, शीतल चव्हाण यांनी महेश कवाने, सुदर्शन नरवाडे, मधुकर माने, रुखमिनाबाई मत्ते, दिलीप कानडे, सचिन कवाने, कृष्णा वारसमवार यांच्या शेतात जाऊन बीजप्रक्रियेचे प्रात्यशिक करून दाखविले.

यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी.

बियाण्यास बुरशी नाशके तसेच जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करूनच पेरणी करावी…! असे आवाहन कृषीकन्यांनी केले.

बुरशीनाशके तसेच जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास रोगास प्रतिबंध होऊन उत्पादन वाढीस मदत होते.

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी…! असे आवाहन यावेळी केले.

सदर उपक्रमाला विषयतज्ञ वाय.एस.वाकोडे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.चींतले यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. ए.बी.तामसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला.