वैष्णवी गोरे खुन प्रकरणी लव जिहादचा आरोपीला फाशीची शिक्षा द्या-सावता सेनेची मागणी

9

✒️अजय मगर(हिंगोली शहर प्रतिनिधी,मो:-8888256369)

*हिंगोली(2जुलै):-* जालना जिल्हातील मंठा तालुका येथील हिंदु धर्मातील गरीब रिक्षा चालक नारायण गोरे यांची 20 वर्षीय मुलगी वैष्णवी गोरे हिची भरदुपारी बाजारपेठेत धारदार शस्ञाने गळ्यावर,पाठीवर व हातावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू याला पोलीसानी पाच तासात अटक केली असुन पोलीसा पासुन वाचण्यासाठी सदरील आरोपीने औषध घेतल्यामुळे दवाखानात ऑडमिट आहे.
आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू हा एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक महिन्यांपासून वैष्णवीला ञास देत होता, शाळेत जाताना-येताना छेड काढणे,जबरदस्तीने लग्न कर म्हणून सांगणे यासारखा ञास वारंवार देत होता. या ञासाला कंटाळून वैष्णवीच्या आई-वडीलांनी तिला शाळेत पाठविणे बंद केले होते.
रिक्षा चालवुन उदरनिर्वाह करणारे गोरे कुंटुबातील वैष्णवी ही एकुलती एक मुलगी होती.
अठराविश्व दारिद्रय तसेच हालाकीच्या परिस्थितीशी दोन हात करत वडिलांनी वैष्णवीचा विवाह मागील आठवड्यात जवळच्या नात्यातील मुलासोबत लग्न लावून देण्यात आले होते. लग्ना नंतर पाच दिवसानी वैष्णवी मांडव परतणीला व सत्यनारायण पुजेसाठी माहेरी आली होती. मंगळवारी चार वाजेच्या दरम्यान वैष्णवी तिची आई आश्विनी गोरे आणि तीची एक मैञीण बाजारात खरेदीसाठी गेल्या होता. साडी आणि अन्य खरेदी झाल्यावर वैष्णवी आणि तिच्या मैञिणीस आईने घरी जाण्याचे सांगितले, त्याच वेळी वैष्णवी आणि तिची मैञीण घरी जात असताना अचानक आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू यांने त्यांना रस्तामध्ये थांबुन तु माझी नाही झाली तर कोणाचीच होऊ देणार नाही म्हणत पाठीमागुन धारदार शस्ञाने वैष्णवीच्या गळ्यावर,पाठीवर,हातावर वार करून ठार मारले..आता पर्यंत कित्येक मुली हा लव्ह जिहादचा शिकार झालेल्या आहे लग्ना अगोदर मुली सुरक्षित नाही आणि लग्नानंतर पण मुली सुरक्षित नाही. सरकारने हैदराबाद प्रकरणासारख्या न्याय द्यावा किंवा सदरील प्रकरण हे फास्ट्रटँक कोर्टात चालवण्यात यावे व लव्ह जिहाद करणारा आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सावता सेनेचे युवक आघाडीचे प्रदेश महासचिव अजय मगर यांनी ईमेल व्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गुहमंञी अनिल देशमुख याच्या कडे केली आहे