महावीर नगर येथील पारमिता बुद्धविहारात वर्षावासास प्रारंभ

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जुलै):-शहरातील महावीरनगर येथील पारमिता बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा आणि पारमिता महिला मंडळ यांच्या वतीने वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कार्यकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म “या ग्रंथांचे वाचन करण्यात येत असते.

महावीर नगर येथील पारमिता बुद्ध विहारात ग्रंथाचे वाचन भगवान खंदारे हे करणार आहेत. तसेच सर्व बुद्धविहारात भारतीय बौध्द महासभा वार्ड शाखा ,शहर शाखा ,ग्रामीण शाखा तसेच बुद्धविहार समितीच्या वतीने प्रत्येक विहारात वर्षावासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष ,माजी सैनिक भारत कांबळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED