भऊरला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सफाई कामगारांने केला दिड कोटींचा घोटाळा-बनावट पावत्या देऊन हडपले पैसे

105

🔺गुन्हा दाखल-आरोपीस अटक

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.17जुुुलै):-देवळा तालुक्यातील भऊर येथिल बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ऱो॑जदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असुन बत्तीस
खातेदारांची सुमारे एक कोटी पन्नास लाख ७३ हजार ४५० रुपयांची अपहार केला आहे फसवणूक करणारया आरोपीस देवळा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून ,काल दिवसभरात बँकेच्या शाखेत अनेक खातेदार व ठेवीदारांनी आपली खाते तपासणीसाठी रीघ लावली असता सदरची रक्कम यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे .याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र कडून अद्याप किती रकमेचा अपहार झाला हे कळू शकले नाही . मात्र काल पर्यंत ३२खातेदारांची १ कोटी ५०लाख ७३ हजार४५० रुपयाच्या रकमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे .

याबाबत देवळा पोलिसांत मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी फिर्याद दिल्याने व खातेदाराची बँके कडे रीघ लागल्याने जिल्हापोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सफाई कामगार भगवान ज्ञानदेव आहेर रहाणार लोहोणेर यास अटक करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर यास गुरुवारी (१४) रोजी दुपारी त्याचा शोध घेऊन सापळा रचून सोग्रस फाटा ता चांदवड येथून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व त्यांचे सहकारी निलेश सावकार ,पुरुषोत्तम शिरसाठ ,ज्योती गोसावी आदींनी माहिती दिली .

भगवान आहेर देवळा- भऊर येथिल बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या सफाई कामगार म्हणून २०१६ पासून नियमितपणे रोजंदारीवर काम करत आहे.ठेवीदार व खातेदार यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडून पीक कर्ज रक्कम घेऊन खातेदार शेतकऱ्यांचे खात्यात जमा न करता बँक ऑफ महाराष्ट्र च्या सही व शिक्का असलेल्या बनावट पावत्या तयार करून खातेदाराना देण्यात आल्या अपहार प्रकरणातील मुदत ठेव पुस्तकातील २७ पावत्या गहाळ झाल्याचे मालेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र क्षञिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा येथे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक वरही आर देवरे अधिक तपास करीत आहे.देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी जिल्हा अधिकारी गंगाथरन डी , पोलिस अधीक्षक सचिन पाटील,व बँक ऑफ महाराष्ट्र वरीष्ठ अधिकारी यांना भेट देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.