राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पंढरपूर तालुका अध्यक्षपदी उमेश सासवडकर तर कार्याध्यक्षपदी विश्वास सुरवसे यांची नियुक्ती

✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

मोहोळ(दि.17जुलै);-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी प्रसिद्ध व्यावसायिक तथा युवराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री . उमेश ललिता ज्योतीराम सासवडकर व भंडीशेगाव माजी उपसरपंच श्री . विश्वास सुरवसे यांची कार्याध्यक्षपदी निवड करून निवडीचे पत्र सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते मा . श्री . कल्याणराव काळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . श्री . नागेश फाटे यांनी निवडीचे पत्र मा . श्री . कल्याणराव काळे साहेब यांचे शुभ हस्ते कारखाना कार्यस्थळावर देण्यात आले व पुढील संघटन कार्यास शुभेच्छा दिल्या .

यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादीचे युवा नेते मा . श्री भगिरथदादा भालके , उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा . श्री . श्रीकांत मुळे यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले . सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक श्री भारत कोळेकर , श्री नारायण शिंदे ,उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, अभय पासले, सुनील पाटील, निलेश काळे, नवनाथ माने, शंकर शिंदे, सुधाकर गाजरे सर, विजय सुरवसे, रामकृष्ण कवडे, वैभव यलमार, विशाल कोडक, दिनेश कवडे, भैया शिंदे सह पदाधिकारी उपस्थित होते .

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED