जिल्ह्यात नवीन तीन कोरोना रुग्ण आढळले.

29

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(2जुलै) : जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक पुरुष (वय ३५ वर्षे) आणि अहेरी तालुक्यातील दोन (वय २० वर्ष महिला व ३१ वर्षे पुरुष) कोरोना बाधित आढळून आले आहेत. सकाळी दोन व आता तीन असे मिळून ५ कोरोना बाधितांमूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या १३ झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ७२ झाली.

धानोरा तालुक्यातील रुग्ण कर्नाटक येथून आल्यावर संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. अहेरी येथील महिला(वय ३५ वर्ष) हैद्राबाद येथून जिल्हयात दाखल झाली होती. अहेरी येथील दुसरा रुग्ण वय ३१ वर्षीय पुरुष दिल्ली येथून जिल्हयात आला होता. दोघेही संस्थात्मक विलगीकरणात होते.
यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित आकडेवारी ७२ झाली. आतापर्यंत एकूण ५८ कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या १३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातून आलेला एक CRPF चा जवान कोरोना बाधित आढळून आलेला आहे. मात्र त्याची नोंद गडचिरोली जिल्हयातील रुग्णांत केली जाणार नाही. सदर रुग्णाची नोंद औरंगाबाद येथे केलेली आहे. फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
त्यामूळे जिल्हयात आज जरी ६ रुग्ण आढळून आले असले तरी जिल्ह्यातील आजची नोंद ५ होणार आहे( एकुण ७२).

*कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती*

दि: २ जुलै सायं ५.०० वा. पर्यंत

▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ७२
▪️ आजचे पॉझिटिव्ह – ०५
▪️बरे होऊन डिस्चार्ज दिले – ५८
▪️ एकूण मृत्यू – ०१
▪️ सध्या कोरोना ऍक्टीव्ह असलेले रुग्ण -१३
▪️निरीक्षणाखाली असलेले संभावित -९२३
▪️दवाखान्यात उपचारामध्ये -१३
▪️आज संस्थात्मक विलगीकरणात असलेले- ८९६
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले-११८
▪️एकुण नमुने तपासणी-७०८९
▪️दुबार नमुने घेतले – ४५७
▪️ट्रु नॅट वरील नमुने -३६२
▪️पैकी निगेटीव्ह-६८९९
▪️नमुने तपासणी अहवाल येणे बाकी-११८
▪️ जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र- ५

*जिल्हयातील तालुकानिहाय कोरोना बाधित व कोरोनामुक्त*

(आकडेवारी क्रम – एकुण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सद्या सक्रिय कोरोना बाधित)

१) गडचिरोली – १०-८-२
२) आरमोरी – ५-३-२
३) वडसा – ६-६-०
४) कुरखेडा – १०-९-१
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – ६-४-२
७) चामोर्शी – ८-५-३
८) मूलचेरा –७-७-०
९) अहेरी – ७-४-३
१०) सिरोंचा –१-०-०(१ मृत्यू)
११) एटापल्ली – ८-८-०
१२) भामरागड –३-३-०

*एकुण जिल्हा – ७२-५८-१३(१ मृत्यू)