भूमिहीन शेतमजुरांच्या सातबाऱ्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याचा सत्कार

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.18जुलै):- भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा (उत्तर) यांच्या वतीने कोल्हटकर स्मारक येथे भव्य जिल्हास्तरीय धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकीकृत झालेल्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रबोधी पाटील, बाबासाहेब आंबेडकरांचे नातु भीमरावजी आंबेडकर, जगदीशजी गवई- राष्ट्रीय सरचिटणीस, डॉ.हरीश रावलिया- राष्ट्रीय ट्रस्टी, भिकाजी कांबळे- राज्यध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा.आदी राष्ट्रीय नेते व कार्यकर्ता कडून असंघटीत भूमिहीनी गायरान, पडीत, वनविभागाच्या जमिनी काढून केलेल्या शेतजमिनीच्या सात बाऱ्यासाठी संघर्ष करणारे नेते. भूमिमुक्ती मोर्चा संघटनेचे राज्य प्रवक्ते भाई बाबुराव सरदार यांचा त्यांच्या धर्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्कृती संघर्षमय योगदानाबद्दल राज्यस्तरीय कार्यक्रमात शाल, पुष्पगुछ, सन्मान चिन्ह, प्रशास्तीपत्रक देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.

आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांनी भाई बाबुराव सरदार यांच्या भूमिहीन शेतमजुरांच्या शेतजमिनी नांवे करून सातबाऱ्यासाठी संघर्ष करण्याच्या आंदोलनाची माहिती जाणुन घेतले व मनोभावे स्तुती केली. त्यामुळे भूमिहीन शेतमजूर असंघटीत कामगारांचा हा माझ्या जीवनातील अनमोल सत्कारासह सन्मान आहे असे भाई बाबुराव सरदार यांनी सांगितले. भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा (उत्तर) यांच्या वतीने एस. एस वाले जिल्हा अध्यक्ष, बी.के हिवराळे जिल्हा महासचिव,के.के. शेगोकार जिल्हा कोषाध्यक्ष यांनी या भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED