उमरखेड तालुक्यात दुसर्‍यादा पावसाचे थैमाण, जन जीवन विस्कळीत

85

🔹नदी व ओढे नाल्यांना पूर, सोयाबीन पिके पाण्यात, मजुरवर्ग उपासी.

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.18जुलै):-तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांत पावसाचे थैमान झाले त्यातच सोयाबीन व कापूस इतर पिकांचे हाल हाल पिके पाण्यात बुडाली.पून्हा दुसर्‍यादा पावसाने थैमान घातले आहे नाही ते शेतकऱ्यांची ऐसी की तैसी करूण शेतक-यांना संकटात ओढले.अतिवृष्टीच्या पावसाने सोयाबीन व कापूस इतर पिकांची हाणी केली सतत पावसाचा हाहाकार वाढला आहे.दि 17जुलै च्या रात्रीपासुन पावसाने थैमान घातले जन जीवन विस्कळीत केले.शेतात पाणी-पाणी झाले नदी काठावरील शेतकर्यांना अतोनात पावसाचे संकट आले आहे.

पैनगंगा नदी काठावरील 40 ते 42गावाला पावसाचे थैमाण झाले सोयाबीन व कापूस अंकुर वाढू लागले त्यातच पावसाचे प्रमाण वाढले आता शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उमरखेड तालुक्यात शहरासह ग्रामीण भागाला अति पावसाचा ठप्पका बसला सगळीकडे पाऊस झाला रस्त्याकाठचे व गावा जवळील ओढे व नाले पूराने भरूण वाहत होते सगळीकडे जलमय झाले.शहरासह ग्रामीण भागात घराबाहेर निघाले नाही कारण पाऊस जास्त होता.सगळा तालुका ओलाचिंब झाला ग्रामीण भागात पोफाळी,मुळावा, कुपटी ढाणकी,विडूळ, ब्राम्हणगाव, चातारी,उंचवडद,लोहरा,खरुस, देवसरी,कोपरा,मानकेशवर, सुकळी नागशवाडी तिवरंग झाडगाव, तरोडा, गंगणमाळ, अंबाळी,जनुना,पळशी,दिवट, पिंपरी,हातला व बंदी भागात 52 वनग्राम अश्या गावाला पावसाचे थैमान झाले अतिवृष्टीचा पिकांना धोका झाला आहे.

तर शासणानी तात्काळ उमरखेड तालुका सरसकट अतिवृष्टी जाहीर करूण आर्थिक मदत तालुक्यातील सगळ्या मंडलातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दयावी.कारण सतत संततधार पाऊसाचे वाढते थैमाणामुळे शेतकऱ्यांचे अति नुकसान झाले.नदीकाठावरील 40 ते 42 गावाला पावसाचा फटका बसला आहे तर शासणाने शेतकर्‍याना सरसकट मदत दयावी.

【शासणानी तालुक्यात सर सकट अतिवृष्टी जाहीर करावी कारण गाव तेथे ओढे व नाले, नदया आहेत तर काही ठिकाणी तलाव आहेत तर तालुक्यात सरसकट आर्थिक मदत दयावी
अशी मागणी शेतकरी करीत आहे .】