


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.18जुलै): -गौण खनिज उत्खनन करून दगड फोडीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या वडार समाजातील परवानाधारकांना गौण खनिज उत्खननात 200 ते 500 ब्रासची सवलत पूर्वीच्या शासन निर्णयानुसार देण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुका वडार समाज संघटनेच्या वतीने उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.महाराष्ट्र शासन महसुल व वने मंत्रालयाच्या सन 2015 च्या शासन निर्णयानुसार अद्याप अंमल बजावणी न झाल्याने पारंपारिक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडार समाज बांधवांची शासनाकडून अक्षरशः क्रूर चेष्टा होत आहे.
परवानाधारक वडार बांधवांना स्थानिक महसुल प्रशासनाने दंडेलशाहीचा अवलंब करीत 2O15 च्या शासन निर्णयाला मुठमाती देऊन वडार समाज बांधवांचा पिढीजात हक्क हिराऊन घेतल्या जात आहे.शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे परंपरागत व्यवसाय डबघाईस आल्यामुळे गरिब समाज बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे.या बाबीची गंभीर दखल घेऊन परवानाधारक वडार बांधवांना गौण खनिज स्वामित्व धनात 200 ते 500 ब्रास ची सवलत द्यावी.
अन्यथा आपल्या न्याय हक्कासाठी आम्हाला तिव्र आंदोलन उभारावे लागेल अशा आशयाचे निवेदन तालुका अध्यक्ष पवन मेंढे, गणेश मेंढे, रमेश मेंढे, माधव जाधव, प्रकाश जाधव, अंकुश बाभूळकर, रमेश पवार, सतिश मेंढे, आनंदराव लष्कर, समाधान लष्कर, संतोष गायकवाड, विनोद धोत्रे, राहुल मेंढे, सुनिल मेंढे, प्रफूल्ल मेंढे, श्यामराव मेंढे, अशोक लष्कर , आशिष शिंदे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.




