गेवराई – गोरक्षनाथ संस्थान बस सेवा सुरू; भाविकांच्या मागणीला यश

46

🔸बससेवा सुरु झाल्याने राजपिंपरी, कोमलवाडी, देवपिंप्री, माटेगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा, सुशी ग्रामस्थांमध्ये आनंद

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

गेवराई(दि.19जुलै):- तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव येथे भाविकांची दर्शनासाठी नेहमी गर्दी असते परंतु या ठिकाणी बस सेवा कोरोना काळात बंद झाली होती यामुळे भाविकांची गैरसोय होवुन कुचंबणा होत होती. यासंदर्भात भाविकांनी एस.टी महामंडळाकडे पाठपुरावा केला.अखेर या पाठपुराव्यामुळे गेवराई- गोरक्षनाथ संस्थान ही बससेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. बस सुरू झाल्याने पंचक्रोशीतील भाविकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान यावेळी संस्थानचे मठाधिपती दत्ता महाराज गिरी यांनी चालक दराडे, वाहक मार्कड यांचा सत्कार केला.
गेवराई तालुक्यातील सुशी, तांडा,कवडगाव, वडगाव, राजपिंपरी, माटेगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा येथील ग्रामस्थांनी गेवराई-गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव ही बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी एस.टी महामंडळाकडे पाठपुरावा केला होता.

गोरक्षनाथ संस्थान येथे जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होत होती तसेच अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागत होते. याठिकाणी येण्यासाठी दुचाकी व खासगी वाहनांनी गोरक्षनाथ संस्थान येथे दर्शनासाठी यावे लागत होते.भाविकांची गैरसौय दूर व्हावी यासंदर्भात सुशी,तांडा, कवडगाव,वडगाव,राजपिंपरी,माटेगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा येथील ग्रामस्थांनी एस.टी मंडळाकडे पाठपुरावा केला.त्यास अखेर यश आले असून.एस.टी.महामंडळाने गेवराई- गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव ही बस सेवा सुरु केली असुन बस सेवा सुरु झाल्याने गोरक्षनाथ संस्थान पंचक्रोशीतील भाविकांनी आनंद व्यक्त करुन आगार प्रमुख यांचे आभार व्यक्त केला. व चालक , वाहक यांचा ठिकठिकाणी सत्कार केला. यावेळी संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, विद्यार्थी, पालक व अदि भाविक उपस्थित होते.