चंद्रपूर शहरातील रेहमत नगर परिसरातील ३५० घरातील परिवारांचे स्थालांतर

31

🔸भाजपा च्या वतीने पूरग्रस्तांना भोजन वाटप

🔹भाजपा चा पूरग्रस्तांना मोठा पाठींबा, स्थालांतर व भोजन वाटपाच्या माध्यमातून केले सहाय्य

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

🔸ब्रिजभूषण पाझारे यांनी चंद्रपूर शहरातील पूरग्रस्त परिसराची केली पाहणी

दि. १८ जुलै (चंद्रपूर) मागील काही दिवसापासून सतत होत असलेल्या पाऊसामुळे चंद्रपूर शहरात पूरपरिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर शहरातील रेहमत नगर परिसरातील वास्तव्यास असलेल्या ३५० घरात पाणी शिरले असल्यामुळे येथील नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. याकरिता माजी अर्थ नियोजन व वने मंत्री मा. आ सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून भाजपा कार्यकर्त्यांनी अनेको परिवारांना मदतीचा हात दिला आहे. पाऊसाचे पाणी घरात शिरल्यामुळे घरातील विद्युत व अविद्युत उपकरणे खराब झालेले आहे.

त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झालाचे दिसून येते. दि. 17 जुलै रोजी माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी देखील रेहमत परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. पूरपरीस्थिमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासने योग्य आर्थिक मोबदला द्यावा याकरिता ब्रिजभूषण पाझारे यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे.रेहमत नगर परिसरात भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी माजी मनपा स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांचा नेतृत्वात नागरिकांनकरिता जेवणाची व्यवस्था करून दिली. रेहमत नगर परिसराची पाहणी करताना ब्रिजभूषण पाझारे यांचा सह चांद शेख, अल्ताफ शेख, जहीर भाई रजा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.