


✒️पालघर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पालघर(दि.19जुलै):-साप्ताहिक स्वराज आंदोलन,संलग्न भारतीय पुरस्कार विजेता संघ,भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विध्यमाने कुणाल भोईर यांना बहुजन समाज रत्न पुरस्कार २०२२ देऊन गौरवण्यात आले.ओबीसी आगरी समाजाचे उद्योजक असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कुणाल भोईर सर ते पालघर मधील सफाळे गावचे रहिवाशी आहेत आणि विशेष म्हणज त्यांची बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांशी पक्की नाळ जुळलेले ते महाधम्म उपासक म्हणून प्रसिद्ध आहेत.
कुणाल भोईर हे सतत समाज घडवण्याचे विचार समाजात रुजवत असतात.मानवता, समता, न्याय, प्रस्थापित होईल याचा ध्यास घेऊन समाज बदल घडवतात. महाराष्ट्रामधील लोककलावंताना कोरोणा काळात खूप मदत केली आहे. कोरोणाच्या काळात आपले सुध्दा परक्या सारखें वागत होते.तेव्हा भोईर साहेबांनी त्या काळात मानवता हाच खरा धर्म आहे आणि मदतीची मुख्य भुमिका साकारली. सामाजिक बांधिलकी म्हणून जी जबाबदारी पार पाडली म्हणूनच साप्ताहिक स्वराज आंदोलन, संलग्न भारतीय पुरस्कार विजेता संघ, भारतीय पत्रकार संघ यांनी बहुजन समाज रत्न पुरस्कार २०२२ साठी कुणाल भोईर यांची निवड केली आणि हा सन्मान सोहळा नाशिक येथे संपन्न झाला.




