


✒️संदिप सोनवणे(येवला विशेष प्रतिनिधी)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.19जुलै):– अंगणगाव ते साताळी नवीन रस्त्याचे काम मंजूर अस्ताना साताळी पासून ते चिचोंडी पर्यंत नवीन डांबरी करण झाले, मात्र अतिशय दर्जाहिन कामामुळे पाहिल्याच पावसात रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडल्याने ठिक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.साताळी पासून येवला शहराला जोडणारा एकमेव रस्ता आहे साताळी पुढे महालखेडा व भिंगारे गावे आहे सर्व गावांना येवला शहरास जोडणारा एकमेव रस्ता आहे.गेल्या दोन महिन्या पूर्वी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याची गुणवता राखली नसल्याने पहिल्याच रिमझिम पावसाच्या सरीत रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडल्याने सर्व नागरिक त्रस्त झाले आहे.
साईट पट्यान्या मुरूम टाकण्यात आलाच नाही, शेजारी असलेल्या नालीतून काळी माती काढून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे त्या मुळे रस्ता खच्चीकरण होत आहे.काम सुरू अस्ताना अनेक जाण्यारे येणारे यांनी संबधीत ठेकेदार यांना सूचित केले होते की काम चांगले करावे आशी मागणी केली होती. मात्र ठेकेदार यांनी दुर्लक्ष्य केले व त्या सोबत अभियंता यांनी ही रस्त्याच्या कामावर लक्ष दिले नाही,आशा निकृष्ट दर्जेचे काम झाले व त्या मुळे शासनाचा जो निधी तो वाया जात आहे रस्तात पडलेल्या खड्या मुळे नागरिक त्रस्त झाले आहे आणि आशा निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी आशी मागणी संतप्त नागरिक यांनी केली आहे.




