कारंजा येथे वृक्षारोपण

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.19जुलै):-कारंजा शहरातील ए आर. सी पब्लिक स्कूलच्या संस्थापिका तथा राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूरच्या अध्यक्षा अरूनाताई चाफले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ए.आर.सी पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.दरवर्षी अरुणा चाफले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात येते.यावेळी एकूण 10 वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला व सामाजिक वणीकरनाचा संदेश देण्यात आला .यात निलगिरी व कडू लिबांच्या झाडांचा समावेश आहे.

0वाढदिवस हा केक कापून नाही तर झाडे लावून साजरा करायला पाहिजे ,केक कापून वाढदिवस साजरा करणे आपली संस्कृती नाही असे मत यावेळी शाळेच्या एमडी सारिका नासरे यांनी व्यक्त केले.यावेळी शाळेच्या एमडी सारिका नासरे ,मुख्यधापक प्रदीप उके ,हिंदी विषयाच्या शिक्षिका सारिका सातपुरे ,स्नेहा मनवर ,बुशरा पठाण ,अमोल केलझलकर ,ललित मस्के, किशन मात्रे ,उमेश साठवणे ,आकांशा यादव, नेहा चौधरी ,सरोज मॅडम व शाळेतील विद्यार्थी वृक्षारोपण करतांना उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED