


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.19जुलै):- कुंभी येथील ग्रामस्थ आनंदराव मेश्राम यांची अचानक प्रकृती बिघडली परंतु गडचिरोली कडे येणारे सर्व मार्ग बंद असल्याने रुग्णाला दवाखान्यात नेण्यास अडथळे येत होते
अश्या परिस्थितीत सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ते दिवाकर निसार यांनी तहसीलदार गडचिरोली यांना संबंधित परिस्थिती ची माहिती दिली व तत्काळ NDRF च्या टीम ला बोलावून आनंदराव मेश्राम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याकरिता काँग्रेस कार्येकर्ते वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, देवेंद्र भांडेकर, जीवन निखुरे, समीर निसार आदींनी सहकार्य केले.




