लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19जुलै):-लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी या सेवाभावी संस्थेच्या नवीन कार्यकारणी चा पदग्रहण समारंभ दि.17 जुलै रोजी राजेश्वर फंक्शन हॉल येथे अतिशय दिमाखात आणि शिस्तबद्ध पध्दतीने संपन्न झाला.अध्यक्षपदी गोविंदराज रोडे,सचिवपदी भगत सुरवसे,कोषाध्यक्ष संजय सुपेकर,सहकोषाध्यक्ष गोपाळ मंत्री ,सहसचिव मकरंद चिनके व नवीन सर्व कार्यकारीणी ला शपथ देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे मावळते अध्यक्ष अतुल गंजेवार हे होते.पद्ग्रहण अधिकारी म्हणून लातुर येथील प्रांतपाल लॉयन डॉ.मन्मथ भातांबरे , रिजन चेअर पर्सन लायन सुनील बियाणी ,लायन एड. दर्शन कळमकर झोनल चेअर पर्सन, लॉ.संतोष भाऊ मुरकुटे,जेष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, संतोष तापडिया तर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते, व्याख्याते व समाजप्रबोधनकार पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रा.मोहन गित्ते यांच्या ध्वज वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लॉ.मन्मथ भातांम्बरे यांनी सर्व नवीन कार्यकारीणी ला येणाऱ्या काळात आपापल्या जबाबदारीचे योग्य मार्गदर्शन करत पद्ग्रहन दिले.व लॉ सुनील बियाणी यांनी इंडक्शन अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले.

उपाध्यक्षपदी बाळासाहेब यादव, रितेश वट्टमवार, जगन्नाथ आंधळे, अर्जुन सोनवणे, मिथिलेश तुपकर,याची निवड करण्यात आली. उमाकांत कोल्हे, प्रदीप गुंडाळे, अभिनय नळदकर ,विजयकुमार बंग, गोविंद अय्या, रविराज शेटे, जगदीश तोतला, चंद्रकांत गादेवार, विष्णू मुरकुटे, अंकुश वाघमारे, प्रकाश टाक, मयूर कुलकर्णी ,अनिल साळवे, रत्नाकर जोशी, सदानंद पेकम, जयदेव जोशी यांना क्लबच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त करण्यात आले .यामध्ये संचालक मंडळ म्हणून संतोष मुरकुटे, अनिल यानपल्लेवार, दशरथ चौधरी, डॉ. हेमंत मुंडे, नंदकुमार पटेल , प्रभाकर झोलकर, श्रीकांत भोसले, मारोती साळवे, प्रकाश घन, संजय धारे, अरविंद लांडगे ,मदन शिंदे, विशाल दादेवाड, प्रशांत गुंडाळे, बंडू घुले ,सचिन महाजन, बालासाहेब सूर्यवंशी, धोंडीराम शेटे, ज्ञानेश्वर गुंडाळे, आदिनाथ मुंडे, अरुण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली.नूतन 55 सदस्यांना लायन्स क्लब सदस्यत्वाची शपथ देण्यात आली . कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक ,व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल घुले तर आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले.